Modi speech OBC मोदी सरकारची मोठी घोषणा ओबीसी नागरिकांना होणार, फायदा काय आहे योजना पहा सविस्तर माहिती.
देश काल ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून आज ध्वजारोहण केले. पंतप्रधानांनी ध्वजारोहण करण्याची ही 10वी वेळ आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. यासोबतच दिल्ली ते जम्मू-काश्मीरपर्यंत पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या तिथल्या सर्व लोकांवर हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली. यानंतर पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून संपूर्ण देशाला संबोधित केले आहे.
अश्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विषयांवर भाष्य केलेले आहे. मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार, पुढील 1000 वर्षे, G-20 शिखर परिषदेचे आयोजन करण्याची संधी, महागाई यासह अनेक गोष्टींवर त्यांनी भाष्य केले आहे. त्यामुळेच यावेळी त्यांनी ओबीसी नागरीकांना विश्वकर्मा योजना राबवणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.PM Modi Varas Nond Online Maharashtra:आता वारसनोंद सह ही 8 कामे तलाठ्याशिवाय घरबसल्या करता येतील! राज्यभरात सुविधा सुरू, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पहा ..
ओबीसी बांधवांसाठी विश्वकर्मा योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा फायदा अनेकांना होणार आहे. देशातील लाखो लोकांना या योजनांचा लाभ झाला आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात घोषणा केली की पुढील महिन्यात सरकार पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांसाठी 13,000 ते 15,000 कोटी रुपयांच्या वाटपासह विश्वकर्मा योजना सुरू करेल.
या योजनेंतर्गत विविध वस्तूंच्या उत्पादकांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. प्रशिक्षण, अनुदान आणि तांत्रिक सहाय्य दिले जाईल. ही योजना लोहार, सुतार आणि कुंभार,माळी यांच्यासाठी असेल. विश्वकर्मा समाजांतर्गत 140 जाती आहेत. या योजनेच्या घोषणेमुळे 2024 च्या निवडणुकीत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.PM Modi speech