Rain update राज्यात सध्या पावसाने दडी मारली आहे. ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून राज्यात पाऊस नाही मान्सून अलनिनोचा प्रभाव आहे. की काय अशी भीती व्यक्त होत आहे परंतु हवामान विभागाने दिलासा देणारी बातमी आज दिली आहे.
Rain update14 ऑगस्ट 2023 राज्यात पावसाने सध्या सुट्टी घेतली आहे ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून पाऊस नाही यंदा मान्सून उशिराने दाखल झाल्यानंतर जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला पावसाने जुलै महिन्यात सरासरी गाठली होती त्यामुळे धरणामध्ये साठा होऊ लागला होता पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणारच होती तर पावसाचा असाच जोर ऑगस्ट महिन्यातही कायम राहिला असता अपेक्षा होती परंतु ऑगस्ट महिना सुरू होताच पावसाने दडी मारली आहे त्यामुळे पाऊस कधी पडणार हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडला आहे.
आता पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद खुशी केळकर यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे उत्तर भारतातील पावसाचा परिणाम राज्यात दिसणार आहे.IMD मॉडेलनुसार महाराष्ट्रात 18 ते 24 ऑगस्ट आणि 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही भागात पावसाचा जोर राहणार आहे. तसेच ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोकण विभागातील काही विभागात पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा भागात सरासरी पाऊस अपेक्षित आहे. पण स्पष्ट नाही मात्र मराठवाड्यात व मध्य महाराष्ट्रात कोरडे वातावरण राहणार आहे असे देखील यावेळी त्यांनी ट्विट करून सांगितले पुणे हा मन विभागाचे प्रमुख के एस ओसिडकर यांनी ट्विट करून अशी माहिती दिली.
18 ते 31 ऑगस्ट महाराष्ट्रात पावसाची एन्ट्री
सध्या राज्यातील या ठिकाणी पाऊस चालू
राज्यात कोकणात सध्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे तसेच राज्यात काही भागात रोड पाऊस होत आहे. परंतु एकंदरीत गेल्या 14 दिवसापासून राज्यात वातावरण कोरडे होते कधी ना काही भागात रिमझिम पाऊस पडतो. तर जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाला भुसावळ तालुक्यात वरणगाव परिसरामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली यामुळे शेती पिकांना जीवनदान मिळाले.
13 ऑगस्ट MID, मॉडेल मार्गदर्शन नुसार महाराष्ट्रात १८ ते २४ आणि २५ ते ३१ ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता विदर्भातील काही भागात आणि शेजारील आणि शेवटच्या आठवड्यात कोकण विभागात तील काही भागात पावसाची शक्यता.दिसत आहे.
🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️
सध्या मध्य महाराष्ट्रात मराठवाडा भागात सरासरी पाऊस अपेक्षित आहे पण हे देखील स्पष्ट करण्यात आले नाही.
पुणे धरण साठा पुण्यात पाणीपुरवठा खडकवासला पानशेत वरसगाव आणि टेमघर या धरणा मधून होतो या धरणामध्ये जलसाठा समाधानकारक झाला आहे त्यामुळे पुणे शहरावर पाणी कपाचे संकट पाहायला मिळत नाही परंतु पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे पुणे जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात केव्हा 44 मिलीमीटर पाऊस झाला आहे यंदाच्या संपूर्ण पावसाळ्यात पुण्यात 570 मिलिमीटर पाऊस झाला होता.