महाराष्ट्र हवामान अंदाज : पुढील सात दिवसांत मध्य महाराष्ट्र पश्चिम आणि दक्षिण भागात पावसाची शक्यता कमी आहे.महाराष्ट्र : राज्यात काही भागात जोरदार पाऊस सुरु आहे, तर काही भागात पावसाची प्रतिक्षा कायम आहे. मुंबईसह कोकणात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी पाहायली मिळत आहे. तर पश्चिम आणि मध्य महाराष्ट्राचे डोळे पावसाकडे लागले आहेत. दरम्यान, आणखी सात दिवस पावसाची वाट पाहावी लागणार आहे. पुढील सात दिवसांत मध्य महाराष्ट्रसह पश्चिम आणि दक्षिण भारतात या भागांमध्ये पावसाची शक्यता कमी आहे, असा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे.
राज्यातील ‘या’ भागात पावसाची प्रतीक्षा कायम
हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, गेल्या 10-12 दिवसात मराठवाडा भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, 18 ते 24 ऑगस्ट महाराष्ट्रात विदर्भ आणि सलग्न मराठवाडा जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर, 25 ते 31 ऑगस्ट या काळात विदर्भ, कोकण, मध्य प्रदेश, ओडीशा, छत्तीसगड या भागातही पावसाच्या सरी पाहायला मिळतील. त्याशिवाय मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात सरासरी इतका पाऊस किंवा मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे.
मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा
अर्धा पावसाळा संपत आला तरी अद्याप मराठवाडा चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. नांदेड वगळता मराठवाड्यात 7 ही जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नाही. मागील 60 दिवसांत फक्त 37.8 टक्के पाऊस झाला आहे. तर नांदेड वगळता एकाही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. तर विभागात अजूनही 13 टक्के पावसाची तूट असून, शेतकरी संकटात सापडला आहे. मराठवाड्यात मागील 60 दिवसांत फक्त 37.8 टक्के पाऊस झाला आहे. नांदेड वगळता एकाही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विभागातील प्रकल्पात फक्त 36.85 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.विशेष म्हणजे गेल्यावर्षी हाच पाणीसाठा 76.40 टक्के शिल्लक होता.
Weather Update आताची ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र मध्ये दक्षिण कोकणात पूर्ण ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता…