today weather update नमस्कार शेतकरी बांधवांनो आज सणाला सुरुवात झाली असताच हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.काय?आहे सविस्तर हवामानाबद्दल माहिती.
आज देशात सर्वत्र होळीची (Holi) धामधूम पाहायला मिळत आहे. एकीकडे रंगाची उधळण पाहायला मिळत असताना दुसरीकडे अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. देशासह महाराष्ट्रात काही ठिकाणी रविवारी रात्री होलिका दहनावेळी पावसाने हजेरी लावली आहे. आजही अनेक भागात पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे.
राज्यामध्ये आज संध्याकाळी या जिल्ह्यात पावसाची शक्यता पहा सविस्तर माहिती येथे क्लिक करून
हवामान विभागाच्या माहितीनुसार, ईशान्य भारत, हिमालयीन भाग, बंगाल आणि सिक्कीममध्ये गडगडाटी वादळासह पाऊस सुरू राहण्याचा अंदाज आहे. याभागात आज 26 मार्चपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) ताज्या अपडेटमध्ये पुढील 24 तासात विविध भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
महाराष्ट्रातील हवामान अंदाज पाहण्यासाठी
🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌩️⛈️⛈️
महाराष्ट्रात हवामान कसे असेल.
today weather update या दरम्यान 26 ते 29 मार्च 2024 मार्च दरम्यान पश्चिम हिमालयातील प्रदेशात आणि वायव्य भारताच्या लगतच्या जमिनी भागात पावसाची अगदी वादळी वाऱ्याची शक्यता आहे.
28 आणि 29 मार्च दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे आज होळीच्या दिवशी देशात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तुळे आली होती यादरम्यान पुढील 24 तासात महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
या भागात पावसाची शक्यता
today weather update आयएमडीच्या (IMD) अंदाजानुसार, ईशान्य आसाम आणि आसपासच्या भागात वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रीय आहे. यामुळे हवामानात बदल होताना दिसत आहे. या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये एकाकी गडगडाटी वादळे आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आपल्याला नवीन व्यवहार करायचा असेल, तर सुरुवातीला जमिनीचे हे 7पुरावे मजबूत आहेत का हे पहा..
एकीकडे होलिका दहन दुसरीकडे तुफान the rain
रविवारी संध्याकाळ नंतर लातूर शहर आणि परिसरात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. होलिका दहन ठिकठिकाणी होत असतानाच जोरदार वाऱ्यासह तुफान पावसानं हजेरी लावली होती. विजेचा गडगडात आणि वाऱ्यासह पडलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
मागील ३ ते ४ दिवसापासून लातूर जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवत होता रविवारी संध्याकाळी नंतर वातावरणात बदल दिसायला सुरुवात झाली तुफान वारा विजेच्या पावसाने जोरदार बॅटिंग केली आणि या पावसामुळे होली का दहन अनेक ठिकाणी झालं होतं काही ठिकाणी होणार होतं यामुळे होलिका दहन साठी खंड पडला होता today weather update.
होलिका दहन होत असतानाच पावसाने जोरदार हजेरी लावलेली अनेक ठिकाणी पाहायला मिळालं आहे. सखल भागामध्ये पाणी साचून होतं. रस्त्यावर पाणी वाहत होतं. हा पाऊस लातूर आणि लातूर ग्रामीणच्या अनेक भागांमध्ये पहावयास मिळाला.
राज्यामध्ये काही दिवसापासून लातूर जिल्ह्यातील जळकोट शहरांमध्ये ही अवकाळी पावसाने हजेरी लावलेली होती.त्यानंतर आज लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडून गेला आहे. लातूर ग्रामीण मधील आंब्याच्या बागेला या पावसामुळे काही प्रमाणात फटका देखील बसलेला पाहायला मिळत आहेtoday weather update.