Ayushman card scheme आयुष्यमान कार्ड योजनेअंतर्गत मिळणार 5 लाख रुपये पर्यंत लाभ

Ayushman card scheme आयुष्यमान कार्ड योजनेअंतर्गत मिळणार 5 लाख रुपये पर्यंत लाभ

नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारची Ayushman Bharat व राज्य सरकारची आयुष्यमान भारत महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे एकत्र करून एकत्र करून राज्य सरकारने राज्यातील बारा कोटी नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेअंतर्गत नागरिकांना पाच लाख रुपयापर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहे.

केंद्र सरकारच्या Ayushman Bharat यादीतील १९ आजारावर या योजनेतील रुग्णालयामध्ये मोफत उपचार मिळणार आहे. उपमुख्यमंत्री ना श्री देवेंद्र फडवणीस यांनी याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री ना श्री मनसुख मानवीय राष्ट्रीय आरोग्य प्राध्याकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री एस गोपाल कृष्णन उपसंचालक श्री रोहित यांच्याशी संवाद साधून हि माहिती पुढे दिली आहे.

आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी

येथे क्लिक करा

या योजनेअंतर्गत एक कोटी आधार कार्ड आरोग्य कार्याचे वाटप ऑगस्टपर्यंत तर दहा कोटी आरोग्य कार्ड पुढील सहा महिन्यात वाटली जातील केंद्र व राज्य सरकारची योजना एकत्र केल्याने केंद्राचा मोठा निधी राज्याला मिळणार आहे. आणि राज्य सरकारचा आर्थिक भारही कमी होण्यास मदत होईल. वैद्यकीय पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारकडे राज्याने 6,000 कोटी रुपयांची मागणी केली आहे, केंद्द्राने 3,000 कोटी रुपये दिले आहेत निधी खेळ वेळेत खर्च केल्यास उर्वरित रक्कम ही देण्यास तयारी ही श्री मांडवीय यांनी दाखवली आहे.

अजित पवारांची मोठी घोषणा शेतकऱ्यांना मिळणार 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज फक्त या शेतकऱ्यांना मिळणार या योजनेचा लाभ

त्यामुळे ग्रामीण आरोग्य सुविधासाठी केंद्राचा निधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहे. प्रत्येक विभागाकडून वेगवेगळ्या दराने औषधी खरेदी होते. हे टाळण्यासाठी लवकरच महामंडळ कार्यरत होणारा असून यांच्यामार्फत औषधे खरेदी केली जाणार आहेत राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय राज्यातील गरजू रुग्णाचे आरोग्य सुदृष्ट राहण्यासाठी मदत देखील होईल सदरील निर्णय अतिशय महत्वाचा पूर्ण आणि उपयुक्त ठरणार आहे.

 

          आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी

येथे क्लिक करा

1 thought on “Ayushman card scheme आयुष्यमान कार्ड योजनेअंतर्गत मिळणार 5 लाख रुपये पर्यंत लाभ”

Leave a Comment

Verified by MonsterInsights