Agricultural Crop Loan Hike:शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता बँका देणार वाढीव पीक कर्ज, पहा कोणत्या पिकासाठी किती कर्ज?

Agricultural Crop Loan Hike:शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता बँका देणार वाढीव पीक कर्ज, पहा कोणत्या पिकासाठी किती कर्ज?

Agricultural Crop Loan Hike कृषी पीक कर्जवाढ : शेतकऱ्यांना शेतीसाठी भांडवल आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांना शेती व्यवसायातून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांकडे शेतीसाठी आवश्यक भांडवल नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी बँका पीक कर्ज देतात.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता बँकांच्या माध्यमातून वाढीव पीक कर्ज मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती व्यवसायातील पैशाची गरज भागवणे शक्य होणार आहे. सोलापूर जिल्हा तांत्रिक समितीने शेतकऱ्यांना वाढीव पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे.

gram samruddhi shet raste yojana: शेतीच्या रस्त्यासाठी मिळणं ९ लाख रुपये अनुदान.

या संदर्भातील आदेश काल अर्थातच बुधवारी जारी करण्यात आले आहेत. याचा फायदा जिल्ह्यातील लहान-मोठ्या सर्व शेतकऱ्यांना होणार आहे, हे उघड आहे. म्हणजेच आता राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा बँकांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बहुतांश पिकांसाठी कर्ज वाटपाची मर्यादा वाढवली आहे.आता या निर्णयानुसार नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाढीव पीक कर्ज देण्यात येणार आहे. दरम्यान, आता या आर्थिक वर्षात कोणत्या पिकाला पीक कर्ज मिळणार याची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Land Record : 1880 पासून बदल, सातबारा, खात्यातील उतारे ऑनलाइन पहा.

या पिकासाठी मिळणाऱ्या पीक कर्जाची रक्कम (हेक्टर)

■बाजरी पिकासाठी हेक्टरी 23 हजार 100 रु

■भुईमूग ३४ हजार रु

■36 हजार 800 रु

■कापूस 49 हजार रु

■मका 29 हजार 700 रु

■टरबूज-कलिंगडसाठी 55 हजार

■फुलशेतीसाठी 35 ते 51 हजार 700 रु

■शेवग्यासाठी ३३ हजार रुपये

■वांग्यासाठी 51 हजार 700 रु

■तसेच गव्हासाठी हेक्टरी 36 हजार 300 रु

■ऊस कोरडा पडल्यास हेक्टरी एक लाख २६ हजार ५०० रुपये

■पूर्वहंगामी व हंगामातील उसासाठी एक लाख २१ हजार

चिकूसाठी 77 हजार

■पडवळे-कारल्यासाठी हेक्टरी ३३ ते ३८ हजार रुपये

■भाजीपाला हेक्टरी सहा हजार ६०० रुपये

याशिवाय पशुपालक शेतकऱ्यांनाही या ठिकाणी कर्ज मंजूर करण्यात येणार आहे. एक गाय असलेल्या शेतकऱ्यांना 35000, एक म्हैस असलेल्या शेतकऱ्यांना 37000,किमान 10 शेळ्या आणि एक बोकड असलेल्या शेतकर्‍यांना 10 हजार रुपयांचे कर्ज दिले जाईल. बँकांच्या माध्यमातून घेतलेल्या या नव्या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे हे नक्की.

👉🏻👉🏻अशाच नवीन आणि महत्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठी इथे क्लिक करा👈👈

Leave a Comment

Verified by MonsterInsights