काय आहे रोव्हर?
रोव्हरचा संपर्क थेट उपग्रहाशी आहे. रोव्हर हा एक मुव्हिंग ऑब्जेट आहे, जो मोजणीच्या ठिकाणी घेऊन जाणे शक्य आहे. याचे कनेक्शन सॅटेलाइटशी आहे. त्यामुळे कुठूनही रोव्हर स्टेशन एखाद्या स्थानाची जास्तीत जास्त अचूकता दर्शविते. रोव्हर घेऊन शेतात मोजणीसाठी जाता येईल, असे ते साधन आहे.
Land records: वडिलांच्या मालमत्तेमध्ये मुलींचा किती टक्के असतो हक्क यावर संपूर्ण माहिती..!
अचूक आणि झटपट मोजणी
रोव्हरद्वारे १ हेक्टर क्षेत्राची मोजणी केवळ ३० मिनिटांत होते, असा भूमी अभिलेख विभागाचा दावा आहे. अचूक आणि झटपट मोजणी या यंत्राद्वारे होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.
शेतकऱ्यांचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.
3 महिन्यांत 2 हजार प्रकरणे निकाली
जिल्ह्यात 3 महिन्यांपूर्वी रोव्हरच्या साहाय्याने जमीनमोजणीचे काम सुरू झाले आहे. 3 महिन्यांत सुमारे 2000 हजार प्रकरणे निकाली काढली आहेत. शहरात 18 रोव्हर आहेत; तर तालुक्याच्या ठिकाणी 2 ते 3 रोव्हर देण्यात आले आहेत.
कोणत्या तालुक्यात किती प्रकरणे निकाली?
तालुका……………. निकाली प्रकरणे
औरंगाबाद… १३७७
फुलंब्री…… ९०
पैठण…. ७०
सोयगाव… ८०
सिल्लोड….. ६३
कन्नड…. ८८
गंगापूर…. ९५
खुलताबाद…. ४८
शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर 3 महिने लागायचे पण आता या यंत्रामुळे जमीन मोजणी करणे अगदी सोपे झाले आहे.
रोव्हरपूर्वी जमीन मोजणी करण्यासाठी तीन महिने लागायचे. आता महिन्याभरात मोजणी होऊन शेतकऱ्यांच्या हाती नकाशा पडणे शक्य झाले आहे. तातडीचे शुल्क भरून देखील शेतकऱ्यांची तारांबळ होत आहे.
जिल्ह्यात ४१ भूमापक इतर….
जिल्ह्यात नऊ भूमी अभिलेख कार्यालय आहेत. शहर कार्यालयात १७ भूमापक आहेत; तर जिल्ह्यातील 8 कार्यालयांत सुमारे २४ भूमापक आहेत. १३७३ गावांतून येणाऱ्या अर्जांसाठी ही यंत्रणा काम करते.