नमस्कार शेतकरी मित्रांनो ऊस कामगारासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे.काय? आहे सविस्तर माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून…
ऊसतोड कामगारांची नोंदणी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे काम जिल्हाधिकाऱ्यांकडे दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे देण्यात आले आहे आणि त्यामुळेच दीपा मुधोळ मुंडे यांनी ऊसतोड कामगारांना आव्हान केले आहे.
विजेच्या बिलापासून दूर राहा घराच्या छतावर बसवा रूफ टॉप सोलर तेही मोफत…!
काय आहे शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक 21 सप्टेंबर 2021 राज्यातील ऊस तोड कामगार ज्या ठिकाणी वास्तव्याला आहेत व जे सतत मागील तीन वर्षापासून ऊस तोडणी करीत आहेत अशा ऊसतोड कामगारांची ग्रामसेवकांनी संबंधित गावातील वस्त्यांमधील वाड्यामधील व इतर सर्वेक्षण करून नोंदणी करून घ्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत.
त्या अनुषंगाने बीड जिल्हा परिषद मार्फत ऑनलाईन वेबसाईट तयार केलेली असून याद्वारे ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्यात यावी असे देखील सांगण्यात आले आहे.
नोंदणी करण्यासाठी
दिनांक सहा जुलै २०२३ रोजी च्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी बीड यांनी सर्व ऊसतोड कामगारांना 15 ऑगस्ट 2023 पर्यंत नोंदणी करण्याचे निधी दिलेले आहेत गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेचे लाभ घेण्यासाठी ऊसतोड कामगार नोंदणी असणे आवश्यक आहे तरी सर्व ऊसतोड कामगारांनी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत नोंदणी करावी असे आव्हान जिल्हाधिकारी कडून करण्यात येत आहे.
ऊसतोड कामगारांना ऑनलाईन नोंदणी करायची असेल तर खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन नोंदणी देखील करू शकता त्यासाठी येथे क्लिक करून नोंदणी करा.
नोंदणी करण्यासाठी