Ahmahabms navinyapurn yojana गाई ,म्हशी गट वाटप अनुदान योजनेत बदल नाविन्यपूर्ण योजनेत सर्वात मोठा बदल

Ahmahabms navinyapurn yojana  या योजनेची पूर्ण माहिती व अर्ज सादर करण्याची कार्यपध्दती याबाबतचा तपशील https://ah.mahabms.com ( AH-MAHABMS ) या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली असून, योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्याने गुगल प्लेस्टोअर वरील AH-MAHABMS या मोबाईल अॅपवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावयाचा आहे. यासाठी आवश्यक ती कार्यपध्दती व वेळापत्रक आयुक्त पशुसंवर्धन, पुणे यांनी निश्चित करावी.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

लाभार्थी निवडताना ३० टक्के महिला लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच, ३ टक्के विकलांग लाभार्थ्यांची ahmahabms scheme 2023 या योजनेंतर्गत निवड करुन त्यांना लाभ देण्यात यावा.

विहीत कालावधीत ऑनलाईन पध्दतीने प्राप्त झालेल्या सर्व अर्जाची छाननी करून लाभार्थी निवड समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड व प्रतिक्षा यादी तयार करण्यात येईल ती पुढील ५ वर्ष म्हणजेच सन २०२५-२६ पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल.

गाई म्हशी अनुदान यासाठी येथे क्लिक करा

 

Ahmahabms navinyapurn yojana  एका कुटूंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ देण्यात येईल. या योजनेंतर्गत लाभ दिलेल्या लाभार्थीस पुन्हा ahmahabms scheme 2023 योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.

या योजनेमध्ये प्रतिदिन १० ते १२ लिटर दूध उत्पादन देणाऱ्या एच एफ, जर्सी या संकरित गायी, प्रतिदिन ८ ते १० लिटर दुध उत्पादन देणाऱ्या गीर, सहीवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर, प्रति दिन ५ ते ७ लिटर दुध उत्पादन देणाऱ्या देवणी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी गायी तसेच, मुन्हा व जाफराबादी या सुधारित जातीच्या म्हशी वाटप करण्यात येतील.

Ahmahabms navinyapurn yojana  वाटप करावयाची दूधाळ जनावरे ही शक्यतो १-२ महिन्यांपूर्वी व्यालेली दुसऱ्या / तिसऱ्या वेतातील असावीत. दुधाळ जनावरांची खरेदी खालीलप्रमाणे गठीत दुधाळ जनावरे खरेदी समितीद्वारे करण्यात येईल.

 

लाभार्थीनी योजनेंतर्गत दिलेल्या शासकीय अनुदानाचा गैरविनियोग केल्याचे निदर्शनास आल्यास, लाभार्थीकडून अनुदानाची व्याजासह एकरकमी वसूली महसूली कार्यपध्दतीने येते.

लाभार्थ्यांकडे दूधाळ जनावरांचे पालन करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असावी. लाभार्थ्यांने दुग्ध व्यवसाय / गो/ म्हैस पालन विषयक प्रशिक्षण घेणे आवश्यक राहील.Ahmahabms navinyapurn yojana 

Sharad pawar Gram Samrudhi Yojana 2023 गाय गोठा, शेळी पालन ,कुक्कुटपालन, शेड अनुजनासाठी असा करा अर्ज

Verified by MonsterInsights